विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्राचे शैक्षणिक क्षेत्रात कार्य सुरू!
विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र 25-Jun-2025
Total Views |
जय श्रीराम!
विष्णुबुवा ब्रह्मचारी (१८२५ - १८७१) यांनी आपल्या देशाच्या सर्वांगीण विकासासाठी समाजातील सर्व जातीपातीच्या बांधवांना शिक्षण मिळाले पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन केले होते. विष्णुबुवांचा आदर्श समोर ठेवून विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्राचे शैक्षणिक क्षेत्रात कार्य सुरू आहे.
केंद्राच्या वतीने गेली दोन वर्षे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते. या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ नुकताच झाला आहे. आज बुधवार २५ जून २०२५ पासून आपल्या संपर्कित शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटपाचे काम सुरू झाले आहे. या शाळांमधे कातकरी जनजातीच्या मुलांचे प्रमाण मोठे आहे.
आज कुडली, ता.रोहा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (८० विद्यार्थी) आणि आदर्श विद्यालय, माध्यमिक शाळा (४८ विद्यार्थी) तसेच सुधागड तालुक्यातील संत नामदेव माध्यमिक विद्यालय, नांदगाव (४०० विद्यार्थी) येथे विविध प्रकारच्या वह्या, लेखन साहित्य, चित्रकला साहित्य तसेच शालेय गणवेशांचे वाटप करण्यात आले. केंद्राचे सचिव श्री. सुरेश गोखले, विश्वस्त सदस्य सौ. प्रतिभाताई पोळेकर आणि सौ. सुलभा गोखले या कार्यक्रमांना उपस्थित होते.
या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती यांच्या सहकार्याने हे कार्यक्रम संपन्न झाले.
अधिक फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा :- विविध प्रकारच्या वह्या, लेखन साहित्य, चित्रकला साहित्य तसेच शालेय गणवेशांचे वाटप