३० जून २०२६
♦️*॥श्री॥*♦️
मान्यवर,
सप्रेम नमस्कार.
तुमच्या सर्वांच्या मजबूत पाठींब्यामुळे विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्राद्वारे सलग चौथ्या वर्षी माणगाव, सुधागड आणि रोहा तालुक्यांतील गरीब आणि गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य देणे शक्य झाले आहे. समाजातील प्रत्येक घटकाने शिकून आपला विकास करून घ्यावा असे विष्णुबुवांचे सांगणे होते. एकसंध, समरस समाजातून बलिष्ठ भारताची उभारणी करण्याचे त्यांचे ध्येय होते. विकसित भारताच्या बांधणीला आपण सर्व जण कटिबद्ध आहोत.
(१) आदर्श प्राथमिक विद्यामंदिर, उतेखोल, ता. माणगाव (२) इंग्लिश स्कुल, जावळी, ता. माणगाव (३) संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नांदगाव, ता. सुधागड (४) रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गौळमाळ, ता. सुधागड या शाळांमधील ६५० मुलामुलींना शैक्षणिक साहित्य - लॉन्ग बुक, वह्या, चित्रकला साहित्य, पेन्सिल किट, पेन, कंपास बॉक्स, जेवण डबा, पाण्याची बाटली, दप्तरे आवश्यकतेनुसार देण्यात आले आहे.
उन्हाळ्यामुळे आज पर्यंत शाळा सकाळी भरत होत्या. उद्यापासून नेहमीप्रमाणे भरतील. साहजिक वाटपावर मर्यादा आल्याने हे काम अजून आठवडाभर तरी चालणार आहे.
सर्वाना यथायोग्य नमस्कार आणि शुभेच्छा. 🌺🌱🪷
अधिक फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा :- विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्राद्वारे शैक्षणिक साहित्य वाटप