एक दिवसीय कौशल्य विकास कार्यशाळा

विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र    29-Sep-2026
Total Views |
Vishnubuwa

🚩 विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र 🚩
माणगाव, जिल्हा - रायगड


मान्यवर,
सप्रेम नमस्कार.

रविवार दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी निजामपूर (ता. माणगाव) येथे एक दिवसीय कौशल्य विकास कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत १० आदिवासी वाड्यांवरील ४२ आणि निजामपूरमधील ४ अशा एकून ४६ मुली आणि महिला सहभागी झाल्या होत्या.

यावेळी खालील कौशल्यांचे प्राथमिक प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

१. मशीनवर लोकरीचे स्वेटर विकणे.
प्रशिक्षक- सौ. प्रेरणाताई कुलकर्णी (मुंबई)

२. बांबूपासून हस्तकलेच्या वस्तू , दागिने आणि कपड्यापासून दागिने बनविणे.
प्रशिक्षक - कु. दिशा वारखंडकर (ता.माणगाव, रायगड)

वरील कौशल्यांचे सविस्तर प्रशिक्षण देण्यासाठी तसेच शिवणकलेसाठी पुढील दोन महिन्यात प्रशिक्षण वर्गांचे आयोजन केले जाणार आहे. त्यासाठी आज नाव नोंदणी करण्यात आली. मुली आणि महिला असे प्रशिक्षण घेण्यास उत्सुक आहेत याचा आनंद वाटतो. पहिला प्रशिक्षण वर्ग १ - २ ऑक्टोबरला ठरला आहे.

आदिवासी महिलांमध्ये कौशल्य विकास झाला तर त्यांना स्वयंरोजगाराचा चांगला मार्ग उपलब्ध होईल. रोजगारासाठी होणारे स्थलांतर कमी होऊन आर्थिक आणि सामाजिक स्थैर्य लाभेल. त्यामुळे मुलांची शिक्षणातील गळती कमी होऊन शैक्षणिक प्रगती साधेल. साहजिकच जीवनाला स्थैर्य लाभेल.

यासाठी आदिवासी बांधवांच्या अडचणी समजून घेऊन त्या दूर करणे, त्यांना आधार देणे, त्यांना प्रेमाची आणि सन्मानाची वागणूक देणे आवश्यक आहे. हे काम एका दिवसाच्या कार्यशाळेचे नाही. यापुढे आपले परिश्रम, संयम, सातत्य आणि निरपेक्ष वृत्तीची गरज आहे. आपण एक पाऊल टाकले आहे. यापुढे खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे.

ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी आपल्या संस्कारशाळांच्या शिक्षिका कौतुकाच्या आणि अभिनंदनाच्या धनी आहेत. प्रशिक्षक आणि माटे कुटुंबियांचे आम्ही ऋणी आहोत.

हार्दिक शुभेच्छा!

सुरेश गोखले
९५७९३७२७९७
 
Vishnubuwa
Vishnubuwa