न्यासाची उद्दिष्ट्ये

13 Dec 2022 11:24:27
या न्यासाच्या स्थापनेमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक स्वर्गीय श्री. मोरोपंत पिंगळे यांची प्रेरणा आहे. या कार्याला पू. सनातन स्वामी (मु. तिकोना पेठ, ता. मावळ, पुणे) यांचे आशिर्वाद आणि मार्गदर्शन लाभले आहे. विष्णुबुवांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श घेऊन समाजप्रबोधन आणि समाजसेवेच्या माध्यमातून बलिष्ठ भारताच्या उभारणीसाठी एकत्रितपणे कार्य करणे हे आपले ध्येय आहे.
 
  • शिरवली गावी विष्णुबुवांनी स्थापिलेल्या श्रीदत्तगुरूंच्या पादुका आणि परिसराचे सुशोभिकरण करणे.
  • शिरवली गावात कार्यालय, यात्रेकरूंसाठी सुविधा निर्माण करणे.
  • विष्णुबुवांचे 200 वे जयंती वर्ष (2024 - 2025) निमित्त विविध उपक्रम राबविणे.
  • विष्णुबुवांच्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार करणे, त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांचे पुनर्मुद्रण करणे. त्यांचे जीवनकार्यावर संशोधन करणे.
  • मुंबर्इ, कोलकत्ता, चेन्नर्इ आणि वाराणसी येथे विष्णुबुवांचे उचित स्मारक बनविणे.
  • युवक, युवती व्यक्तिमत्व विकास आणि प्रशिक्षण वर्ग करणे.
  • अनुसूचित जाती-जमाती आणि बहुजन समाजासाठी शैक्षणिक, सामाजिक, सेवाभावी प्रकल्प चालविणे.
  • निसर्गसंवर्धन ,योग, कला गुणांचा प्रसार करणे.
Powered By Sangraha 9.0