विष्णुबुवा जयंती - नागपंचमी

विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र    20-Mar-2023
Total Views |

nagapanchami

विष्णुबुवांच्या जयंतीनिमित्त नागपंचमी, २ ऑगस्ट २०२२ ला सकाळी श्री. धोंडू सावंत यांचे हस्ते विष्णुबुवा स्थापित श्रीदत्तगुरूंच्या पादुकांवर अभिषेक करण्यात आला. अभिषेक आणि आरतीला शिरवली ग्रामस्थ, विष्णुबुवा केंद्राचे कार्यकर्ते आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
 
आरती झाल्यानंतर विठ्ठल रखुमाई मंदिरात विद्यार्थी आणि गावकऱ्यांसाठी विष्णुबुवांचे चरित्र आणि कार्य यावर विष्णुबुवा केंद्राचे उपाध्यक्ष श्री. सुनिलजी जगताप, सहसचिव श्री. प्रभुदासजी घरत यांनी आपले विचार मांडले. विष्णुबुवांनी समाजसुधारणेसाठी केलेले अविश्रांत परिश्रम, सोसलेल्या हालअपेष्ठा, बहुजन आणि उपेक्षित बांधवांबद्दल त्यांचे मनात वसणारी कणव वक्त्यांनी आपल्या भाषणांतून मांडली.
 
 
अधिक फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा :- विष्णुबुवा जयंती - नागपंचमी