माणगाव तालुक्यातील चांदेवाडी येथे ४३ कातकरी मुलांना स्वेटर वाटप

04 Dec 2025 14:36:41
 
Mangaon3
 
रविवार दि. ३० नोव्हेंबर रोजी माणगाव तालुक्यातील चांदेवाडी येथे ४३ कातकरी मुलांना स्वेटर वाटप करण्यात आले.

हे स्वेटर्स पुण्यातील ज्येष्ठ नागरिक श्रीमती प्रभाताई पेंढारकर (वय ८७ वर्षे) कोथरूड, पुणे यांनी स्वतः मुलांसाठी विणले. श्री. अरुणजी वडनेरकर आणि सौ. अपर्णाताई साने यांच्या पुढाकाराने हे स्वेटर्स  विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र यांना वाटप करण्यासाठी देण्यात आले होते.

चांदे वाडीतील केंद्राच्या अभ्यासिका शिक्षिका सौ. कविता वालेकर, केंद्राच्या कार्यकर्त्या सौ. सुरेखा दांडेकर आणि सौ. सुलभा गोखले यांनी स्वेटर्सचे वाटप केले.

आम्ही श्रीमती प्रभाताई पेंढारकर यांचे ऋणी आहोत. 🌺🌻🌸


अधिक फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा :-  स्वेटर वाटप
Powered By Sangraha 9.0