विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र

विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र    06-Jun-2025
Total Views |
६ जून २०२५

🚩 विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र 🚩
माणगाव, जिल्हा रायगड

मान्यवर,

सप्रेम नमस्कार. जय श्रीराम.

सामाजिक कर्तव्याच्या उदात्त भावनेतून; तुमच्या सहकार्याच्या बळावर आपण शिरवली (विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे जन्मगाव) पंचक्रोशीतील शाळांमधील गरजू, गरीब विद्यार्थ्यांना - जून २०२३ मध्ये ५०० आणि जून २०२४ मध्ये १४४८ जणांना शैक्षणिक साहित्य - पाठयपुस्तके, वह्या, कंपास पेटी आणि गणवेश व छत्र्या दिल्या. यावर्षी सुद्धा आपण अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, छत्र्या आणि गणवेश देणार आहोत.

या उपक्रमासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्याची यादी खाली दिली आहे.

(१) १० वी पाठ्यपुस्तकांचे - ७५ संच
(एका संचाची अंदाजे किंमत - ९०० रु.)

(२) ९ वी पाठ्यपुस्तकांचे - ७५ संच
(एका संचाची अंदाजे किंमत - ८०० रु.)

(३) वह्या - इयत्ता ८ वी ते १० वी साठी
२०० पानी लाँग बुक - २००० वह्या
(एका वहीची किंमत - ६० रु.)

(४) वह्या - इयत्ता ५ वी ते ७ वी साठी
विविध प्रकारच्या वह्या - ३०००
(एका वहीची किंमत - ३० रु.)

(५) गणवेश - ३५०
(एका गणवेशाची किंमत अंदाजे - ५०० रु.)

(६) छत्र्या - ३००
(एका छत्रीची अंदाजे किंमत - २०० रु.)

यावर्षी १० कातकरी वाड्यांवर अभ्यासिका आणि संस्कार शाळा सुरू करण्याचा संकल्प आहे. पहिल्या अभ्यासिकेची सुरुवात एप्रिल २०२५ मध्ये पाटणूस वाडी, भिरा येथे झाली. या अभ्यासिकांमध्ये शिक्षिका म्हणून कातकरी समाजातील तरुण मुलींना मानधन देऊन नेमायचे आहे. मुलांना आठवड्यातून दोनदा खाऊ द्यायचा आहे. बाकी आवश्यक साहित्य उपलब्ध करावे लागेल. एका अभ्यासिकेचा अपेक्षित वार्षिक खर्च अंदाजे रु. ५०,०००/- इतका आहे.

कृपया गरजू, गरीब मुलामुलींच्या उज्वल भविष्यासाठी आपण उदार हस्ते आर्थिक मदत करावी, तसेच आपले नातेवाईक, मित्रमंडळी, परिचितांनाही आवाहन करावे.

आपल्या बँक खात्याचे नाव, खाते क्रमांक खाली दिला आहे. सोबत क्यूआर कोड पाठवीत आहे.

Name - Vishnubuva Brahmachari Samajik Kendra

Bank - Bank of Baroda,
Branch - Mangaon

Current A/c no. - 48960200000113

IFSC code - BARB0MANGAO

B ... A.... R.....B....0 (शून्य) ...M ....A .....N.... G....A....O (ओ)



QR code


देणगी बँकेत जमा केल्यावर खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर बँक मेसेज किंवा स्क्रिनशॉट अवश्य पाठवा. त्यामुळे केंद्राच्या कार्यालयात आवश्यक नोंदी करणे आणि देणगीची पावती तयार करणे सोईस्कर होते.

शाळा १६ जून ला सुरू होणार आहेत.

सर्वांना नमस्कार आणि हार्दिक शुभेच्छा. 🌺🪷🌸

आपला स्नेहांकित,
सुरेश गोखले
9579372797

वेबसाईट - vishnubuvabrahmachari.com