कुडली, ता.रोहा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (८० विद्यार्थी) आणि आदर्श विद्यालय, माध्यमिक शाळा (४८ विद्यार्थी) तसेच सुधागड तालुक्यातील संत नामदेव माध्यमिक विद्यालय, नांदगाव (४०० विद्यार्थी) येथे विविध प्रकारच्या वह्या, लेखन साहित्य, चित्रकला साहित्य तसेच शालेय गणवेशांचे वाटप करण्यात आले. केंद्राचे सचिव श्री. सुरेश गोखले, विश्वस्त सदस्य सौ. प्रतिभाताई पोळेकर आणि सौ. सुलभा गोखले या कार्यक्रमांना उपस्थित होते...